बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झालं. गेल्या २० जूनपासून मुंबईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, श्वसनास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र आज सकाळी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९४८ साली झाला होता. सरोज खान हे बॉलिवूड मधील डान्स डायरेक्टरच्या यादीतलं अव्वल नाव होते. किशनचंद सद्धू सिंह आणि नोनी सद्धू सिंह यांच्या घरी जन्मलेल्या सरोज यांचे खरे नाव निर्मला किशनचंद्र संधु सिंह नागपाल होते. फाळणीनंतर सरोज यांचे कुटुंब पाकिस्तानातून भारतात स्थायिक झाले. वयाच्या तिसऱ्या वर्षीच 'नजराना' या चित्रपटातून त्यांचं हिंदी चित्रपटसृष्टीत बाल कलाकार म्हणून पदार्पण झालं होतं. या बालकलाकाराची कारकीर्द पुढे नृत्यक्षेत्रामध्ये बहरली. पुढे हा कलाकार ग्रुप डान्सर बनला. त्यानंतर असिस्टण्ट डान्सर आणि १९७४ ला त्यांनी 'डान्स मास्टर' म्हणून पहिल्या सिनेमाला कोरिओग्राफी केली. तो सिनेमा होता, 'गीता मेरा नाम'. तेव्हापासून ते आज पर्यंत त्यांनी अख्ख्या बॉलिवूडला आपल्या तालावर त्यांनी नाचवलं होते.
#lokmat #Lokmatcnxfilmy #SarojKhan #sarojkhanluxuriouslifestyle #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber